








M275 Sri Matajinchya Charanashrayee - 2 (श्रीमाताजींच्या चरणाश्रयी - भाग 2)
Non-returnable
Rs.80.00 Rs.100.00
Tags:
Product Details
Specifications
या ग्रंथामधील लेखांमधून संन्यासी-गृही, नर-नारी तसेच समाजातील बहुविध स्तरांवर असलेल्या व्यक्तींच्या श्रीमाताजीविषयींच्या आठवणी वाचून त्यांच्या अलौकिक व्यक्तिमत्त्वाची थोडीफार ओळख वाचकांना अवश्य होईल. श्रीमाताजी या दिसण्यास सर्वसामान्य मानवी रूप धारण केलेल्या, व्यवहारात सर्वसामान्य स्त्रीप्रमाणेच वावरणाऱ्या वाटत असल्या तरी या दृश्य व्यक्तिमत्त्वामागे कोणती दिव्य शक्ती कार्य करीत होती याचा आपण केवळ अंदाजच करू शकतो. श्रीमाताजींच्या सरळ व मधुर अशा वाणीतून कितीतरी जीवांना अंतरी शांती प्राप्त होऊन त्यांच्या जीवनाला ‘अर्थ’ लाभला आणि त्यांची जीवने खऱ्या अर्थाने सफल झाली आणि अजूनही कितीतरी जणांवर श्रीमाताजी अनुग्रह करीतच आहेत. ही आपली कृपामयी, आनंदमयी जननी स्थूल देहात जरी नसली तरी अजूनही तिची आपल्या सर्व संतानांवर कृपादृष्टी आहे; ती त्यांच्यावर आपल्या वात्सल्याचा वर्षाव अनवरतपणे करीतच आहे. या गोष्टीचा अनुभव घेण्यासाठी आपण आपल्या या जननीलाच शरण जाऊन व्याकुळतेने प्रार्थना करायला हवी. श्रीरामकृष्णांशी अभिन्न असलेल्या श्रीमाताजी या गुणातीत व गुणस्वरूप, सर्वातीत व सर्वगत अशा मंगलस्वरूपिणी आहेत. त्यांना जाणण्यासाठी त्यांच्या कृपेची अपेक्षा असते. आपण आपल्या बुद्धीने, तर्काने वा कल्पनेने त्यांना कदापि आकळू शकत नाही.
General
- AuthorCompilation
- Compiler/EditorSwami Purnatmananda
- TranslatorSmt. Shakuntala D Punde