

















Product Details
Specifications
भगवान श्रीरामकृष्ण स्वामी विवेकानंदांचा ‘ध्यानसिद्ध’ म्हणून उल्लेख करीत असत. अशा या ‘ध्यानसिद्ध’ महर्षींच्या आध्यात्मिक अनुभूतिगम्य विवेचनावर आधारित त्यांनीच प्रतिपादिलेल्या विचारांचा संग्रह असलेले ‘ध्यान आणि त्याच्या पद्धती’ हे पुस्तक आहे. स्वामी विवेकानंदांनी फक्त भारतीय आध्यात्मिक परंपरेचाच अभ्यास करून त्यानुसार ध्यानाविषयीच्या विविध पैलूंना आमच्यासमोर ठेवलेले नाही तर मनुष्य-जीवनासाठी व त्याच्या ध्येयासाठी त्यांची आवश्यकता देखील आपल्यासमोर मांडली आहे. त्याचबरोबर त्यांनी गभीर ध्यानाद्वारे सुप्त आध्यात्मिक शक्तीला जागृत करून दैनंदिन व्यावहारिक जीवनामध्ये दिव्यता प्राप्त करण्याविषयी देखील अधिक भर दिला आहे. पुस्तकाची उपयुक्तता वाढविण्यासाठी ख्रिस्तोफर ईशरवुड यांचे व संपादकांचे प्रास्ताविक आणि स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील ध्यानासंबंधीच्या काही घटना अंतर्भूत करण्यात आल्या आहेत. या घटना मूळ पुस्तकातून संपूर्णपणे जशाच्या तशाच अनुवादित न करता काही काही ठिकाणी स्वामी विवेकानंदांच्या उपलब्ध असलेल्या मराठी चरित्रातून घेण्यात आल्या आहेत.
General
- Compiler/EditorSwami Chetanananda