









Product Details
Specifications
‘How to Overcome Mental Tension’ या इंग्रजी पुस्तकाचा हा मराठी अनुवाद आहे. आधुनिक युगामध्ये आपण जसजशी वैज्ञानिक प्रगती करीत आहोत तसतसे अधिकाधिक आध्यात्मिक मूल्यांपासून दूर जात आहोत. परिणाम-स्वरूप आपले मानसिक संतुलन नष्ट होत आहे. त्यामुळे आपल्या मानसिक समस्या देखील दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यांपासून मुक्ती मिळविण्याचे उपाय या लौकिक विज्ञानामध्ये आपल्याला सापडत नाहीत. त्यासाठी आपल्याला सनातन आध्यात्मिक उपायांचे साहाय्य घेणे आवश्यक आहे. परंतु या आध्यात्मिक महासागरामध्ये ते उपाय आपल्याला कुठे सापडणार? ही अडचण लक्षात घेऊन रामकृष्ण मिशन आश्रम, नवी दिल्लीचे भूतपूर्व सचिव स्वामी गोकुलानंद ह्यांनी या आध्यात्मिक महासागराचे मंथन करून त्यातून हे नवनीत आपल्याला दिले आहे, ज्याच्या साहाय्याने आधुनिक मानवाला मानसिक तणावापासून मुक्ती प्राप्त करण्यासाठी उपाय सापडेल.
General
- AuthorSwami Gokulananda
- TranslatorKaumudi Patil