






Product Details
Specifications
कुंतीपुत्र, ज्येष्ठ पांडव, सम्राट युधिष्ठिर त्याच्या प्रसिद्ध नावाप्रमाणेच धर्मराज होता. त्याचा हा गौरव स्वयं भगवान श्रीकृष्ण, श्रीव्यास, नारदादी ऋषिमुनी तसेच भीष्म, द्रोण, विदुर या धर्मज्ञ महात्म्यांद्वारे झाला आहे. युधिष्ठिराची धर्म जाणण्याची सूक्ष्म बुद्धी, सत्यनिष्ठा, संयमितपणा, समतोलपणा, उदारता, क्षमाशीलता, दया, विवेक, न्यायप्रियता, विनय, कारुण्य, ईश्वरनिष्ठा व धर्मपरायणता या गुणांचे तसेच त्या गुणांना व्यवहारात आणण्याचे त्यांचे कौशल्य, संभाषण-चातुर्य – या सर्वांचे मनोग्राही दर्शन या चरित्रातून आपल्याला होते. सध्याच्या सांस्कृतिक, सामाजिक, नैतिक आणि राजनैतिक पातळ्यांवर प्राचीन भारताच्या आदर्शमूल्यांचा ऱ्हास होत असलेल्या पार्श्वभूमीवर हे धर्मराज युधिष्ठिराचे चरित्र सूर्याप्रमाणे तेजस्वी आणि चंद्राच्या चांदण्याप्रमाणे शीतल व आल्हाददायी असल्याचा अनुभव येतो. प्रस्तुत चरित्राच्या वाचनाने वाचकांच्या मनात या आदर्श जीवनमूल्यांची प्रेरणा निश्चितच निर्माण होईल.
General
- AuthorS M Kulkarni