





Product Details
Specifications
प्रस्तुत पुस्तकाचे लेखक स्वामी जपानंद हे रामकृष्ण संघाचे एक वरिष्ठ संन्यासी होते. आपल्या संन्यस्त जीवनामधे भगवद्प्राप्तीच्या इच्छेने त्याच्यावरच निर्भर होऊन अकिंचन परिव्राजक म्हणून त्यांनी भरपूर भ्रमण केले होते. आपल्या भ्रमणकाळामध्ये त्यांच्यावर अनेकदा अत्यंत कठीण परिस्थिती उद्भवली होती. त्यावेळेस अचानक विविध प्रकारच्या कनवाळू, दयावंत अशा अनेक लोकांकडून त्यांना साहाय्य प्राप्त झाले होते. त्याचबरोबर इतरत्र देखील अनेकदा त्यांना विविध प्रकारे मानवतेचे दर्शन घडले होते. या सर्व गोष्टी खरोखरच अत्यंत उद्बोधक आणि प्रेरणादायी अशा आहेत. ह्या सर्व अद्भुत अनुभवांमधून वेळोवेळी त्यांना मनुष्यातील दैवीगुणांचा प्रत्यय आला. त्याचे सुंदर चित्रण त्यांनी ‘मानवता की झाँकी’ या आपल्या हिन्दी पुस्तकात केले आहे. आपल्या अनुभवांद्वारे इतर साधकांनाच नव्हे तर सर्वसामान्यांना देखील प्रेरणा मिळावी या इच्छेनेच त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक रामकृष्ण कुटीर, बिकानेर (राजस्थान) येथून प्रकाशित झाले होते. प्रस्तुत पुस्तकात लेखकाने स्वत:चा उल्लेख ‘‘एक संन्यासी’’ म्हणून केला आहे. आणि सर्व घटनांमध्ये ते स्वत: इतरांप्रमाणे एक त्रयस्थ आहेत अशा अनासक्त भावनेने त्यांनी हे लिखाण केले आहे.
General
- AuthorSwami Japananda
- TranslatorSwami Vipapmananda