




Product Details
Specifications
स्वामी विवेकानंदांनी आपल्या समकालीनांना, गुरुबंधूंना, शिष्यांना, सहकार्यांना व हितचिंतकांना पत्रे लिहून त्यांमधे आपले विचार त्यांच्यासमोर प्रकट केले होते. त्या पत्रांमधून जीवनाच्या सर्वांगीण — आध्यात्मिक, व्यावहारिक, नैतिक इ. सर्वच पैलूंचा सांगोपांग विचार आलेला आहे. प्रस्तुत पुस्तिकेत अशा काही जीवनावश्यक स्फूर्तिप्रद वचनांचे संकलन करण्यात आले आहे. स्वामीजींनी ह्या पत्रातील विचार जरी व्यक्तिपरत्वे व्यक्त केलेले असले तरी त्यांच्या विशुद्ध व ऋषितुल्य मनातील विचार हे सर्व मानवजातीच्या कल्याणासाठीच अभिव्यक्त झालेले आहेत. म्हणून त्यांच्या शब्दांमधून मानवजीवनाच्या ‘सफलतेचे रहस्य’ प्रकट झाले आहे. याच्या अध्ययनाने वाचक आपले जीवन निश्चितच सफल करून घेतील, याशिवाय त्यांच्या मनामधे स्वामीजींची संपूर्ण पत्रे वाचण्याची इच्छा उत्पन्न होईल.
General
- AuthorSwami Vivekananda
- Compiler/EditorDr. G N Natu