




M154 Hindu Dharmachi Ruparesha (हिंदू धर्माची रूपरेषा)
Non-returnable
Rs.40.00 Rs.50.00
Tags:
Product Details
Specifications
अतिप्राचीन काळापासून भारतात सनातन वैदिकधर्म मनुष्यमात्राच्या आध्यात्मिक व नैतिक विकासाचा उपाय म्हणून नव्हे तर मोक्षप्राप्तीचे साधन म्हणून गौरविला गेला. तोच सनातन वैदिकधर्म आता ‘हिंदुधर्म’ ह्या नावाने ओळखला जात आहे. परंतु ह्या हिंदुधर्माची मूळ तत्त्वे कोणती व हा धर्म कोणत्या शाश्वत आधारावर आजपर्यंत टिकून आहे ह्याची कल्पना आपल्यापैकी फारच थोड्यांना असते. रामकृष्ण मिशन आश्रम, बेलघरिया, कलकत्ता यांनी स्वामी निर्वेदानंदांचा ‘‘Hinduism At a Glance’’ हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. त्यात हिंदुधर्माच्या निरनिराळ्या तत्त्वांचे व मतांचे थोडक्यात पण स्पष्ट वर्णन केले आहे. प्रस्तुत ‘हिंदुधर्माची रूपरेषा’ त्याच ग्रंथाचा मराठी अनुवाद होय. ग्रंथाच्या प्रस्तावनेत लेखकाने ग्रंथ लिहिण्याचा मूळ उद्देश विशद करून सांगितला आहे. स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे, ‘‘धर्म म्हणजे मनुष्याचे मूळचे जे ब्रह्मरूप आहे त्याचे प्रकटीकरण.’’ ह्या ग्रंथाच्या वाचनाने वाचकाला हिंदुधर्मान्तर्गत उदात्त तथ्ये कळून त्याला आपल्या धर्माची व्यापकता व उदारता यांची कल्पना येईल.
General
- AuthorSwami Nirvedananda
- TranslatorSri V M Lohit