



Product Details
Specifications
श्रीरामकृष्णदेव ईश्वरत्व, पवित्रता आणि सरळता यांचे मूर्तिमान स्वरूप होते. त्यांच्या महिमामय दिव्य जीवनाने आणि अमृतमय उपदेशांनी जगातील सर्व स्तरांतील लोकांना आध्यात्मिक मार्गदर्शन आणि परमशांती प्राप्त होत असते. त्यांच्या ह्या अद्भुत जीवनामध्ये परमज्ञान, शुद्धभक्ती आणि काम-गंधहीन प्रेम यांचा अपूर्व त्रिवेणी संगम पहायला मिळतो. ते खरोखरच जगद्गुरू होते. फ्रेंच मनीषी श्री. रोमाँ रोलाँ यांनी सारगर्भित शब्दांमध्ये त्यांना आपली हार्दिक श्रद्धांजली अर्पण केली आहे. ते म्हणतात, “भारताचे गेल्या दोन हजार वर्षांचे आध्यात्मिक जीवन श्रीरामकृष्ण आपल्या पन्नास वर्षांच्या आयुष्यात जगले होते. श्रीरामकृष्णांच्या जीवनसंगीतातून जगातील हजारो धर्मपंथ व उपपंथ यांच्या भिन्नभिन्न व विरोधी भासणाऱ्या स्वरांच्या मिलनाचा मंजुळ ध्वनी निघतो.” स्वयं भगवान श्रीरामकृष्ण रूपात अवतीर्ण झाले होते हेच ह्या अलौकिक जीवनातून आपल्या निदर्शनास येते. भगवान श्रीरामकृष्णांच्या अशा अलौकिक जीवनामधून अगणित मानव दिव्य प्रेरणा प्राप्त करून धन्य झाले आहेत. त्यांचा हा महिमा ह्या पुस्तकाच्या रूपात वाचकांच्या समोर आम्ही ठेवत आहोत.
General
- AuthorAkshaykumar Sen