




M117 Vartaman Yuga Sathi Adhyatmik Adarsha (वर्तमान युगासाठी आध्यात्मिक आदर्श)
Non-returnable
Rs.40.00
Tags:
Product Details
Specifications
प्रस्तुत पुस्तक श्रीरामकृष्ण मठ, मद्रास यांनी प्रसिद्ध केलेले ‘Spiritual Ideals for the Present Age’ या पुस्तकाचा अनुवाद आहे. यात रामकृष्ण मठ व मिशन या संस्थेचे माजी अध्यक्ष श्रीमत् स्वामी वीरेश्वरानंदजी महाराज यांच्या काही निवडक लेखांचे व व्याख्यानांचे संकलन करण्यात आले असून त्यांतून वर्तमान युगातील मानवासाठी आवश्यक असलेल्या आध्यात्मिक आदर्शाचे अत्यंत सुंदर रीतीने विवेचन करण्यात आले आहे. विज्ञानाच्या आश्चर्यकारक प्रगतीमुळे वर्तमान युगातील मानवाचे जीवन अनेकविध भौतिक सुखसोयींनी समृद्ध झाले असले तरी ते घोर अशांती, वैफल्य, असंतोष व नाना प्रकारच्या जटिल समस्या यांनी ग्रासलेले आहे. अशा परिस्थितीत श्रीरामकृष्ण, श्रीसारदादेवी व स्वामी विवेकानंद यांनी मानवाच्या दिव्य स्वरूपावर आधारलेला व ‘खरा माणूस’ निर्माण करणारा जो उज्ज्वल जीवनादर्श जगाला दिला तो किती कालोपयोगी व व्यवहार्य आहे हे प्रस्तुत पुस्तक वाचताना पदोपदी जाणवते. या पुस्तकातील ‘भगवत्प्राप्तीचे मार्ग’ आणि ‘वृंदावनातील श्रीरामकृष्ण-मंदिर व त्याचा आध्यात्मिक पाया’ या प्रकरणांचा अनुवाद स्वामी वागीश्वरानंदांनी व ‘धर्म आणि धर्मजीवन’ या प्रकरणाचा अनुवाद स्वामी योगात्मानंदांनी केला असून उरलेल्या सर्व प्रकरणांचा अनुवाद स्वामी व्योमरूपानंदांनी केला आहे. जीवनाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने प्रस्तुत पुस्तक अत्यंत हितकारक ठरेल.
General
- AuthorSwami Vireshwarananda
- TranslatorSwami Vyomarupananda