









Product Details
Specifications
भगवत्पूज्यपाद श्रीमत् आद्यशंकराचार्य यांना अद्वैतवेदान्ताचे प्रतिष्ठाते व संन्यासी-संप्रदायाचे गुरू म्हणता येते. ते असामान्य प्रतिभासंपन्न महापुरुष होते. आपल्या दिव्य ज्ञानशक्तीने त्यांनी सनातन वैदिक धर्माला पुनरुज्जीवित केले. त्यात अनेक विधायक व व्यवहार्य सुधारणा करून त्यास त्यांनी सुदृढ पायावर प्रतिष्ठित केले. भारतात सर्वत्र संचार करून त्यांनी प्रांताप्रांतांत आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ऐक्य स्थापन केले व संपूर्ण देशामधे धर्मजागृती आणली. धर्मराज्यात दिशाभूल होऊन इतस्तत: भटकणार्या जनांवरील अपार करुणेने प्रेरित होऊन आचार्यानी त्यांच्या कल्याणार्थ जे महान कार्य केले त्याचा प्रभाव आजही टिकून आहे. आचार्यांचे प्रामाणिक चरित्र सहज उपलब्ध नाही. ‘शंकर विजय’ आणि ‘शंकरदिग्विजय’ ही दोन जुनी चरित्रे उपलब्ध असली तरी त्यांत वास्तव इतिहास आणि किंवदंती यांची सरमिसळ झालेली आहे. स्वामी अपूर्वानंद यांनी प्रमाणभूत ग्रंथांच्या आधारे अत्यंत श्रमपूर्वक बंगाली भाषेत ‘आचार्य शंंकर’ हे पुस्तक लिहिले. प्रस्तुत पुस्तक त्याचा अनुवाद आहे. आचार्यांचे महनीय चरित्र वाचकांना स्फूर्तिदायक व मार्गदर्शक ठरेल असा आम्हाला विश्वास वाटतो.
General
- AuthorSwami Apurvananda
- TranslatorP. G. Sahastrabuddhe