










Product Details
Specifications
मराठी वाङ्मयात शक्तिपूजेसंबंधी अशा प्रामाणिक ग्रंथाची आवश्यकता होतीच. शक्तिपूजेविषयीच्या यथार्थ ज्ञानाच्या अभावी जनमानसात बर्याच भ्रमात्मक कल्पना आस्तत्वात आहेत. प्रस्तुत पुस्तकात लेखक स्वामी सारदानंद यांनी शक्तितत्त्वासंबंधीच्या अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांची चर्चा करून त्या भ्रमांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला आहे. शक्तिपूजेचा उगम, तिचा क्रमविकास, तिची आध्यात्मिक बैठक, तसेच मानवी जीवनाचा जो चरमोद्देश — भगवत्प्राप्ती — त्या संदर्भात शक्तिपूजेची उपयोगिता इत्यादी विषयांवर मूलगामी चर्चा करून साधकाच्यापक्षी नारीकडे बघण्याची खरीखरी कल्याणकारी दृष्टी कोणती याचे अत्यंत उद्बोधक विवरण श्रद्धेय लेखकांनी यात केले आहे. लेखक — स्वामी सारदानंद — हे श्रीरामकृष्णदेवांच्या अंतरंगीच्या लीलासहचरांपैकी एक असून त्यांचे आध्यात्मिक अनुभव जितके सखोल होते तितकीच त्यांची विद्वत्ता प्रगाढ होती. प्रस्तुत अप्रतिम ग्रंथ त्यांच्या शक्तिसाधनेतील दिव्य प्रत्यक्षानुभूतीमधूनच जन्मास आला. वास्तविक, प्रस्तुत ग्रंथ दोन भागात काढण्याचा स्वामीजींचा विचार होता. परंतु दुसरा भाग लिहिण्यापूर्वीच त्यांनी इहलीला संपविली. शक्तिपूजेवरील त्यांचा हा ग्रंथ वंगदेशात अत्यंत अधिकृत मानला जात असून बंगाली वाचकांमधे तो विशेष लोकप्रिय आहे.
General
- AuthorSwami Saradananda
- TranslatorSwami Vagishwarananda