




Product Details
Specifications
आमच्या आश्रमातून प्रकाशित होणार्या ‘जीवन-विकास’ नामक मासिकाच्या सप्टेंबर 1959 ते डिसेंबर 1959, आणि फेब्रुवारी 1960 या अंकात कठ उपनिषदावर संपादकीय लेखमाला प्रसिद्ध झाली होती. तीच लेखमाला प्रस्तुत पुस्तकाच्या रूपाने वाचकांना सादर करण्यात येत आहे. कठ उपनिषद हे अतिशय काव्यमय आणि अत्यंत महत्त्वाचे असे एक उपनिषद आहे. मृत्युदेवता यम आणि आत्मज्ञानाची उत्कट तळमळ असलेला आदर्श साधक नचिकेता यांच्यामधील संवादाचे वर्णन या उपनिषदात आले आहे. या संवादात यमराजांनी नचिकेत्याला श्रेय आणि प्रेय, आत्मविद्या, आत्मलाभाची साधना, मोक्ष इत्यादी महत्त्वपूर्ण विषयांचा उपदेश केला आहे. या उपदेशाच्या अनुषंगाने यमराजांनी नचिकेत्याला आध्यात्मिक जीवनाचे आणि आध्यात्मिक साधनेचे रहस्य उलगडून दाखविले आहे. मानवजीवनाचे अंतिम लक्ष्य जे आत्मज्ञान आणि या आत्मज्ञानाने लाभणारे जे खरे सुख व जी खरी शांती ती कशी प्राप्त करून घ्यावी हे यमराजांनी नचिकेत्याला या उपनिषदात स्पष्ट करून सांगितले आहे. जीवनाचा सर्वांगांनी विकास घडवून आणण्यासाठी आणि आदर्श मानव होण्यासाठी या उपनिषदात वर्णिलेल्या शाश्वत सत्यांपासून सर्वांना अमोघ असे मार्गदर्शन लाभते. ‘‘उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत’’ — ‘‘उठा, जागे व्हा आणि थोर आत्मदर्शी महापुरुषांना शरण जाऊन आत्मज्ञान प्राप्त करून घ्या’’ असे आवाहन करणार्या या उपनिषदाच्या अध्ययनाने सर्वांना धर्ममार्गात नवीन स्फूर्ती व प्रेरणा लाभेल.
General
- AuthorSwami Shivatattwananda