









M256 Gita Bhashyartha Prakash (श्रीगीता भाष्यार्थ प्रकाश)
Non-returnable
Rs.225.00 Rs.250.00
Tags:
Product Details
Specifications
स्वामी विवेकानंद म्हणतात – “आपण उपनिषदांचे अध्ययन केले तर अनेक असंबद्ध विषयांच्या गुंतागुंतीच्या जाळ्यातून भ्रमण करीत असताना अकस्मात एखाद्या महान सत्याचे विवेचन आपल्याला आढळून येते. जंगलात पाने, काटे इत्यादींसह एखादे गुलाबाचे सुंदर फूल आपल्याला आढळावे तसेच हे आहे. आणि गीतेत काय दिसून येते? गीतेत या सत्यांची सुव्यवस्थित व आकर्षक अशी मांडणी केलेली आढळते. गीता ही एखाद्या सुंदर हारासारखी अथवा निवडक पुष्पांच्या गुच्छासारखी आहे. तत्पूर्वीच्या सर्व पवित्र ग्रंथांपासून गीतेचा वेगळेपणा दाखविणारी अशी तिची मौलिकता कशात आहे? ही मौलिकता पुढीलप्रमाणे आहे : गीतेच्या आगमनापूर्वी जरी योग, ज्ञान, भक्ती इत्यादी मार्गांपैकी प्रत्येकाचे अगदी निष्ठावंत अनुयायी होते तरी ते सर्व परस्परांशी भांडत असत. प्रत्येक मार्गाचा अनुयायी हा ‘माझाच मार्ग श्रेष्ठ आहे’ असा दावा मांडी. कोणीही या विविध मार्गांचा समन्वय करण्याचा प्रयत्न केला नव्हता. गीताकारानेच प्रथम या सर्व मार्गांचा समन्वय करण्याचा प्रयत्न केला. त्या काळी अस्तित्वात असलेल्या सर्व पंथांमध्ये जे काही असे उत्कृष्ट असे होते ते गीताकाराने स्वीकारले आणि गीतेत ग्रथित केले.” पुढे श्रीशंकराचार्यांनी गीतेवरील आपल्या भाष्याद्वारे अद्वैत वेदान्ताच्या सर्वसमावेशक अधिष्ठानावर या सर्व धर्ममतांचा आपल्या अलौकिक प्रतिभेने सुसमन्वय केला. अधिकार-अभिरुचीनुसार विविध साधनापथांचे दिग्दर्शन करणाऱ्या आपल्या सनातन धर्माची महत्ता यातून अधोरेखित होते.
General
- AuthorPt. D V Jog