




Product Details
Specifications
स्वामी विवेकानंदांची पत्रे’ या ग्रंथाशी वाचक परिचित आहेतच. स्वामीजींनी विविध व्यक्तींना, विविध प्रसंगी लिहिलेल्या बोधपर निवडक १८ पत्रांचा हा संग्रह प्रस्तुत पुस्तिकेद्वारे युवा वर्गाच्या हाती आम्ही देत आहोत. ह्या निवडक पत्रांची विशेषता अशी आहे की ही पत्रे स्वामीजींनी आपल्या भारतीय शिष्यांना, मित्रांना व मठातील आपल्या गुरुबंधूंना लिहिली आहेत. या पत्राद्वारे आपल्याला स्वामीजींची युवकांविषयी असलेली कळकळ, आणि त्यांचे युवकांवरील प्रेम दृष्टिगोचर होते. त्याचबरोबर नव्या पिढीला खरा धर्म म्हणजे काय? खरे देशप्रेम म्हणजे काय? खरा सुहृदभाव म्हणजे काय? इत्यादी गुणांविषयी व त्यांच्या प्राप्तीविषयी मार्गदर्शन प्राप्त होते. पुस्तिका अत्यंत छोटेखानी असल्यामुळे वाचकवर्ग ती आपल्या जवळ नेहमी ठेवू शकेल व आवश्यकतेनुसार तिचे वाचन करून तिच्यातील उपदेशांनुसार चिंतन व आचरण करू शकेल. वाचकांच्या सोयीसाठी यातील काही पत्रे येथे आम्ही हेतुतः संक्षिप्त करून दिलेली आहेत.
General
- AuthorSwami Vivekananda
- Compiler/EditorSwami Srikantananda