




Product Details
Specifications
आपल्या पुरातन संस्कृतीबाबत – वेदान्तिक सत्यांबाबत अनभिज्ञ असणाऱ्या युवकांना आपल्या सनातन-चिरंतन संस्कृतीचा परिचय करून देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ते विचार आजच्या संदर्भात किती उपयोगी आहेत, हेही त्यांच्यासमोर ठेवणे आवश्यक आहे. आपले हे औपनिषदिक आणि पौराणिक तत्त्वज्ञान म्हणजेच अध्यात्मविषयक भारतीय तत्त्वज्ञान होय. संसाराचा त्याग करून संन्यस्त-जीवन यापन करणे म्हणजे काय व समाजात राहूनच त्यागमय जीवन कसे यापन केले जाऊ शकते या दोहोंचीही ओळख करून देणे आवश्यक आहे. हाच दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून ‘स्वामी विवेकानंदांच्या सहवासात’ या ग्रंथामधे प्रश्नोत्तररूपात आलेले विचार या पुस्तिकेद्वारे युवकांसमोर ठेवण्यात आलेले आहेत. यांतील स्वामी विवेकानंदांचे विचार आजच्या युवा पिढीला प्रबोधित करणारे आहेत. त्यामुळे ही पुस्तिका वाचून स्वामीजींचे समग्र वाङ्मय वाचण्याची व त्याद्वारे आपले जीवन समृद्ध करून घेण्याची आकांक्षा युवा पिढीच्या मनात निर्माण होईल, अशी आम्हास खात्री वाटते.
General
- AuthorSwami Vivekananda
- Compiler/EditorSwami Srikantananda