




Product Details
Specifications
आपल्या सनातन वैदिक धर्माच्या ज्ञानकांडाला उपनिषद असे म्हणतात. हजारो वर्षांपूर्वी भारतामधे जीव-जगत, आत्मा-परमात्मा, ब्रह्म व माया तसेच त्यासंबंधीच्या इतर विषयांवर गंभीर चिंतन करून जी मीमांसा करण्यात आली व जे अनुभव सिद्ध झाले, तेच उपनिषदांमध्ये संकलित करण्यात आले आहे. यालाच ‘वेदान्त’ असेही म्हणतात. श्रीमद् आद्यशंकराचार्यांनी उपनिषदे, ब्रह्मसूत्र व गीता या प्रस्थानत्रयीवर भाष्य लिहिले आहे, त्याचबरोबर उपनिषदे वा वेदान्त अभ्यासण्यापूर्वी काही पूर्वतयारी करण्याच्या दृष्टीने त्यांनी काही ‘प्रकरणग्रन्थ’ लिहिले. त्यांपैकीच ‘आत्मबोध’ हा एक महत्त्वाचा लहानसा ग्रन्थ आहे. वेदान्ताचा अभ्यास करणार्या सर्वच साधकांसाठी हा अत्यंत उपयोगी आहे. यामधे फक्त अडुसष्ठ श्लोकांमधे आत्म्याविषयीचे विवरण करण्यात आलेले आहे. या आत्म्याचा लाभ करून घेण्यासाठी काय काय साधना करणे आवश्यक आहे आणि आत्मज्ञान झाल्यावर साधकाला काय लाभ होतो याचे विवरण श्रीमद् आद्यशंकराचार्यांनी सुललित संस्कृतमधे केले आहे. मूळ संस्कृत श्लोक योग्यप्रकारे समजण्यासाठी या पुस्तकात त्यांचा पदच्छेद आणि अत्यंत सोप्या-सरळ भाषेत अनुवाद देण्यात आला आहे. तसेच अभ्यासकांसाठी शेवटी वर्णानुसार श्लोकानुक्रमणिका दिलेली आहे.
General
- AuthorSrimad Shankaracharya
- TranslatorSwami Vipapmananda