






M217 Mazya Vivekanandanchya Smriti (माझ्या विवेकानंदांच्या स्मृती)
Non-returnable
Rs.25.00
Tags:
Product Details
Specifications
स्वामी विवेकानंद हे युगपुरुष होते. साहजिकच ते कोण्या एका देशासाठी अवतरित झाले नव्हते. त्यामुळे विश्वातील सर्वच देशांतील, सर्व स्तरांतील स्त्री-पुरुषांचे ते प्रेरणास्रोत होते. त्यांच्या चरणांशी आश्रय घेऊन अनेकांनी आपले जीवन कृतार्थ करून घेतले होते. अशा कित्येक कृपाप्राप्त लोकांनी स्वामीजींच्या आठवणी लिहून ठेवल्या आहेत. त्या ‘Reminiscences of Swami Vivekananda’ या नावाने इंग्रजीमध्ये प्रकाशित झाल्या. त्याचा मराठी अनुवाद ‘आम्ही पाहिलेले स्वामी विवेकानंद’ या नावाने प्रकाशित करण्यात आला. त्यांतील भगिनी ख्रिस्तीन यांनी लिहिलेल्या आठवणींना आपले एक विशेष महत्त्व आहे. म्हणूनच या आठवणी आम्ही स्वतंत्र पुस्तकाच्या रूपात प्रकाशित करीत आहोत. भगिनी ख्रिस्तीन म्हणतात, ‘‘अशा एका थोर पुरुषाला मी पाहिले आहे, त्याचे बोलणे ऐकले आहे, त्याला अत्यादराने पूजिले आहे. माझ्या सर्वान्त:करणाचा भक्तिभाव मी त्याच्या चरणी वाहिला आहे. असा महापुरुष केवळ निरुपम असतो, कारण तो यच्चयावत् साधारण मापदंडांच्या व आदर्शांच्या पलीकडे असतो.’’ प्रस्तुत पुस्तक स्वामी विवेकानंदांचे प्रभावी, दैवी व्यक्तिमत्त्व समजून घेण्यास निश्चितच लाभदायी ठरेल.
General
- AuthorSister Christine