







M211 Sankshipta Sri Ramakrishna Vachanamrit (संक्षिप्त श्रीरामकृष्णवचनामृत)
Non-returnable
Rs.90.00 Rs.100.00
Tags:
Product Details
Specifications
भगवान श्रीरामकृष्ण आपले शिष्यगण व भक्त यांच्या समवेत संभाषण करीत तेव्हा आपल्या अनेक दिव्य अनुभवांचे सरळ शब्दांत विवेचन करीत असत. त्यांच्या प्रभावाने उपस्थित भक्तांच्या आध्यात्मिक जीवनाचा पाया भक्कम होत असे. त्यांच्या अमृतमयी वाणीची त्यांच्या एका प्रख्यात शिष्याने — श्री. महेंद्रनाथ गुप्त अर्थात श्री.‘म’ यांनी आपल्या दैनंदिनीत टिपणे घेतली होती आणि नंतर ती पुस्तक रूपात प्रकाशित केली होती. मूळ बंगाली भाषेत असलेले ‘श्रीरामकृष्णकथामृत’ सुरवातीला पाच भागांत प्रकाशित झाले होते, त्यात इ. स. 1882 ते इ. स. 1886 पर्यंतचे श्रीरामकृष्णांचे संभाषण समाविष्ट करण्यात आले होते. हा संपूर्ण ग्रंथ मराठीमधे दोन भागांत ‘श्रीरामकृष्णवचनामृत’ नावाने प्रकाशित झाला आहे. मराठीमधे स्वामी शिवतत्त्वानंदांनी त्याचा अनुवाद केला आहे. वाचकांच्या सोयीसाठी हा ग्रंथ आम्ही संक्षिप्त रूपात प्रकाशित करीत आहोत. श्रीरामकृष्ण संघाचे वरिष्ठ संन्यासी स्वामी निखिलानंद यांनी त्यांतील निवडक भागाचे इंग्रजीमधे प्रकाशन केले होते. त्या आधारानेच हे संकलन तयार केले आहे. आध्यात्मिक साधकांना हा ग्रंथ निश्चितच उपयोगी व कल्याणकारी होईल.
General
- AuthorSri Mahendranath Gupta
- TranslatorSwami Shivatattwananda