




M194 Sri Ramakrishnanche Divya Jivan (श्रीरामकृष्णांचे दिव्य जीवन)
Non-returnable
Rs.40.00
Tags:
Product Details
Specifications
भगवान श्रीरामकृष्ण हे स्वामी विवेकानंदांचे गुरू होते ही गोष्ट तर सर्वश्रुत आहेच. स्वामी विवेकानंद आपल्या व्याख्यानांमधून श्रीरामकृष्णांविषयी फार क्वचितच बोलत असत. त्याच्याविषयीचे एक संपूर्ण व्याख्यानही त्यांनी एकदाच दिले होते. ते ‘माझे गुरुदेव’ या नावाने प्रकाशित झाले आहे. तरीदेखील प्रसंगवश स्वामीजी श्रीरामकृष्णांविषयी जे काही थोडे-फार बोलत असत त्यातून स्वामीजींचा श्रीरामकृष्णांविषयीचा भाव कसा होता — त्यांच्या विषयीची धारणा काय होती याची आपल्याला स्पष्ट कल्पना येते. युगाचार्य स्वामी विवेकानंदांच्या दृष्टीतून जर आपण श्रीरामकृष्णांकडे पाहिले तर ते श्रीरामकृष्णांना ‘अवतारवरिष्ठ’ का म्हणतात हे आपल्याला सहज समजून येईल. प्रस्तुत पुस्तक म्हणजे श्रीरामकृष्ण मठ, चेन्नई द्वारा ‘Sri Ramakrishna As I Saw Him’ या पुस्तकाचा अनुवाद होय. यात विशेषकरून स्वामी विवेकानंद ग्रंथावलीमधून श्रीरामकृष्णांविषयीच्या स्वामीजींच्या विचारांचे संकलन केले आहे. तसेच श्रीरामकृष्णवचनामृतातूनही स्वामीजींनी श्रीरामकृष्णां-विषयी काढलेले उद्गार संग्रहित केले आहेत. याशिवाय स्वामीजींनी श्रीरामकृष्णांवर काही स्तोत्ररचना केली आहे त्या स्तोत्रांचा आणि श्रीरामकृष्णांच्या आरतीचाही या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे.
General
- AuthorSwami Vivekananda