




M178 Yajnyawalkya-Maitreyee Samvad (बृहदारण्यक उपनिषदातील याज्ञवल्क्य-मैत्रेयी संवाद)
Non-returnable
Rs.30.00
Tags:
Product Details
Specifications
भारतीय संस्कृती ब्रह्मविद्येच्या शाश्वत ज्ञानावर टिकून आहे आणि ब्रह्मविद्या गुरु-शिष्य परंपरेने भारतात अबाधित आहे. पण या याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी संवादाचे वैशिष्ट्य असे की ब्रह्मज्ञ ऋषी याज्ञवल्क्य आणि त्यांची ब्रह्मवादिनी पत्नी मैत्रेयी यांचा सारगर्भित, तलस्पर्शी संवाद जगाच्या प्राचीन आध्यात्मिक इतिहासात अनन्य साधारण असा आहे. प्रस्तुत पुस्तकात हा आध्यात्मिक ज्ञानाचा पैलू स्वामी विवेकानंद व भगवान श्रीरामकृष्णांच्या विवेक, वैराग्ययुक्त वचनांनी अधिक उजळून दिसेल. माताजी श्रीसारदादेवींचा आदर्श जीवनात उतरवून पुन्हा भारतात गार्गी-मैत्रेयी निर्माण होतील असे स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे. यावरून ब्रह्मवादिनी मैत्रेयी यांचा आध्यात्मिक अधिकार लक्षात येईल. ब्रह्मज्ञ पती व ब्रह्मवादिनी पत्नी यांचा हा परमपावन बोधप्रद संवाद सूज्ञ वाचकांमध्ये चिरशांतिप्रद आत्मज्ञानाची पिपासा निर्माण करील.
General
- AuthorSwami Shivatattwananda