






M164 Srimad Bhagawatatil Bhakti-Nirjhar (श्रीमद् भागवतातील भक्तिनिर्झर)
Non-returnable
Rs.128.00 Rs.160.00
Tags:
Product Details
Specifications
‘श्रीमद्भागवत’ ह्या ग्रंथाचे नाव घेतले की आपल्या समोर भगवान श्रीकृष्णाचे लीलाचरित्र डोळ्यांसमोर येते. परंतु हा ग्रंथ म्हणजे एवढेच नव्हे. यामधे भगवंताच्या इतरही अवतारांची लीला विस्तृतपणे वर्णन केली आहे. ही लीला वर्णन करीत असताना विविध प्रसंगी भगवंताची त्या त्या अवताराला अनुलक्षून स्तुती देखील केली आहे. साधारणपणे श्रीमद्भागवतावरील उपलब्ध ग्रंथांमधे भगवंताच्या लीलावर्णनाचाच ऊहापोह तथा गुणवर्णन केलेले आढळते. प्रस्तुत ग्रंथामधे भागवतातील स्तुतिस्तोत्रांचे यथायोग्य विवरण आणि विवेचन लेखकाने केले आहे. या स्तुतिस्तोत्रांद्वारे भक्तांच्या हृदयामधे भक्तिनिर्झर वाहण्यास मदत होईल. त्याचबरोबर त्या त्या अवताराचे प्रयोजन व त्याचे मूळ स्वरूप समजण्यास देखील मदत होईल. खरे तर परमात्म्याच्या निर्गुण-निराकार स्वरूपाचे हे भगवंताचे अवतार सगुण-साकार रूप होत. अर्थात तेच ‘सत्य’ कशाप्रकारे शरीर धारण करून जगद्धिताय अवतरित होत असते याविषयीचे विवरण या स्तोत्रांमधे आपल्याला आढळते. श्रीमद्भागवत महात्म्यात म्हटले आहे — निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतम्। पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुका:॥ 6.80) — हे रसिक आणि भावुक जन हो! हे श्रीमद्भागवत वेदरूपी कल्पवृक्षाचे परिपक्व फळ आहे. श्रीशुकदेवरूप शुकाच्या (पोपटाच्या) मुखातून पडल्यामुळे ते अमृतरसांनी परिपूर्ण झालेले आहे. अशाप्रकारचे हे भागवतरूपी रसभरित अमृत आपण पुन:पुन्हा प्राशन करा.
General
- AuthorDr. S B Varnekar