




Product Details
Specifications
भगवान श्रीरामकृष्ण यांचे अंतरंगीचे शिष्य स्वामी सारदानंद यांनी श्रीमद्भगवद्गीतेवर कलकत्ता शहरी ठिकठिकाणी काही व्याख्याने दिली होती. ती व्याख्याने अत्यंत उद्बोधक असून त्यातून आत्मानुभूतिसंपन्न आचार्यांच्या आध्यात्मिक प्रतिभेचे दर्शन घडते. पुढे या व्याख्यानांचा व स्वामीजींनी वेदान्तविषयावरील लिहिलेल्या काही लेखांचा संग्रह ‘गीतातत्त्व’ या नावाने प्रसिद्ध झाला. मूळ बंगाली पुस्तकाचे महत्त्व लक्षात घेऊन त्यातील प्रकरणांचा अनुवाद ‘जीवन-विकास’ या आमच्या मासिकाच्या माध्यमातून (ऑक्टोबर 1984 ते फेब्रुवारी 1986 या दरम्यान) मराठी वाचकांना सादर करण्यात आला.
General
- AuthorSwami Saradananda
- TranslatorSwami Vagishwarananda