






M099 Sadhak Sadhana Ani Siddhi (साधक, साधना आणि सिद्धी: स्वामी ब्रह्मानंदांची संभाषणे)
Non-returnable
Rs.60.00
Tags:
Product Details
Specifications
हे पुस्तक भगवान श्रीरामकृष्णांचे ‘मानसपुत्र’ स्वामी ब्रह्मानंद महाराज यांच्या बहुमोल आध्यात्मिक उपदेशांचे संकलन आहे. युगावतार श्रीरामकृष्णांच्या या मानसपुत्राचे मन सदैव अति उच्च आध्यात्मिक भावभूमिकेवर विचरण करीत असे. त्यांच्या अगदी सामान्य कार्यांतूनही त्यांचे दिव्य आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व प्रकट होत असे. वेळोवेळी त्यांच्या मुखातून साध्या संभाषणाच्या रूपात साधकजीवन, साधना आणि सिद्धी या विषयांवर अशी काही उद्बोधक गहन तत्त्वे प्रकट होत की जी ऐकताना श्रोत्यांची मने सहज उच्च आध्यात्मिक पातळीवर आरूढ होत. सरळ, सुबोध भाषेत असलेल्या त्यांच्या या उपदेशांनी साधकांच्या जीवनातील अनेक जटिल समस्यांचे सहज समाधान होई व त्यांच्या मनात ईश्वरदर्शनाची तीव्र आकांक्षा उत्पन्न होऊन साधनेविषयीचा प्रबळ उत्साह उचंबळू लागे. ही परम सद्भाग्याची गोष्ट आहे की महाराजांच्या काही साधकशिष्यांनी वेळोवेळी त्यांची काही संभाषणे टिपून ठेवली. पुढे या संभाषणांचे संकलन पुस्तकरूपात प्रसिद्ध करण्यात आले. धर्मपिपासू वाचकांना एका नवीन, स्फूर्ती व प्रेरणा देणार्या ग्रंथाचा लाभ झाला. या पुस्तकाच्या अध्ययन-अनुशीलनाने वाचकांना योग्य मार्गदर्शन लाभून त्यांच्या जीवनाचा विकास होईल असा आम्हाला विश्वास वाटतो.
General
- AuthorSwami Brahamananda
- TranslatorSwami Vagishwarananda