




Product Details
Specifications
प्रस्तुत पुस्तकात स्वामी विवेकानंदांच्या काही निवडक लेखांचा संग्रह केला आहे. या लेखांचे विषय विविध असले तरी त्या सर्वांवरून धर्म, संस्कृती, सामाजिक उन्नती इत्यादी सर्वच विषयांसंबंधीचा स्वामी विवेकानंदांचा आध्यात्मिक दृष्टिकोन दिसून येतो. भारत ही जशी धर्मभूमी आहे तशीच ती अनेक संस्कृतींची मीलनभूमी देखील आहे. प्रस्तुत पुस्तकात स्वामी विवेकानंदांनी धर्माचे आणि भारतीय संस्कृतीचे जे विवरण केले आहे ते सखोल असून त्यात भारतीय विचारप्रणालीचे मनोज्ञ दर्शन घडते. भारताच्या ऐतिहासिक क्रमविकासाचा स्वामी विवेकानंदांनी प्रस्तुत पुस्तकात जो आढावा घेतला आहे तो विचारप्रवर्तक आहे. धर्माचे रहस्य कशात आहे आणि मानवाच्या विकासाला तो कसे साहाय्य करू शकतो हे स्वामी विवेकानंदांनी प्रस्तुत पुस्तकात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण प्रभावी शैलीने विशद करून सांगितले आहे. याबरोबरच मातृभूमीवरील त्यांचे प्रेम किती प्रगाढ होते आणि मातृभूमीच्या उद्धाराची त्यांना किती उत्कट तळमळ लागली होती याचाही प्रत्यय प्रस्तुत पुस्तकातील त्यांचे विभिन्न लेख वाचले म्हणजे आल्यावाचून राहत नाही.
General
- AuthorSwami Vivekananda
- TranslatorP. G. Sahastrabuddhe