




Product Details
Specifications
स्वामी विवेकानंदांनी निरनिराळ्या ठिकाणी जी व्याख्याने दिली होती त्यांच्या टिपणांचा संग्रह प्रस्तुत पुस्तकात केला आहे. स्वामी विवेकानंदांच्या दिव्य प्रतिभेचा विलास त्यांच्या विविध विषयांवरील व्याख्यानांत दिसून येतो. त्यांनी आपल्या व्याख्यानात आध्यात्मिक विषयांबरोबरच उच्च जीवनाला उपकारक असे अनेक विषय हाताळले आहेत. मानवाने आत्मपरीक्षण करून व सन्मार्गाने जाऊन जीवनाचा सर्वांगीण विकास करावा आणि मोक्षाचे वा पूर्णत्वप्राप्तीचे ध्येय प्राप्त करून घ्यावे असे स्वामी विवेकानंदांना प्राणोप्राण वाटत असे. प्रस्तुत पुस्तकात संग्रहित केलेल्या विभिन्न व्याख्यानांच्या टिपणांत त्यांची ही तळमळ दिसून येते. जीवन उन्नत बनविण्यासाठी कोणत्या उपायांचे अवलंबन केले पाहिजे यासंबंधीचे ज्ञान स्वामी विवेकानंदांचे मौलिक व स्फूर्तिदायी विचार वाचले म्हणजे आपोाआपच प्राप्त होते. हे विचार आत्मसात करून ते कृतीत आणल्याने वैयक्तिक व सामूहिक दोन्ही दृष्टींनी मानवाचे कल्याण झाल्यावाचून राहणार नाही.
General
- AuthorSwami Vivekananda
- TranslatorV K Lele