



Product Details
Specifications
स्वामी विवेकानंदांनी पाश्चात्त्य देशांमधे जो प्रवास केला होता त्याचा वृत्तान्त त्यांनी दैनंदिनीच्या रूपाने लिहिला होता. प्रस्तुत पुस्तक हा त्या दैनंदिनीचा मराठी अनुवाद आहे. स्वामी विवेकानंदांनी ही दैनंदिनी खुसखुशीत भाषेत विनोदी पद्धतीने लिहिली होती. त्यांची मुळातली लेखनशैली अनुवादातही कायम ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
स्वामी विवेकानंदांनी ज्या ज्या देशांत प्रवास केला होता त्या त्या देशांतील लोकांचे समाजजीवन, त्यांचा इतिहास, त्यांच्या चालीरीती इत्यादी गोष्टींचेही त्यांनी निरीक्षण केले होते. त्यामुळे त्यांच्या प्रवासवृत्तान्तात प्रवासाचे केवळ वर्णनच आढळत नाही, तर त्याबरोबरच विभिन्न देशांच्या जीवनपद्धतीचे आणि तेथील विचारप्रणालीचे चित्रही रेखाटलेले दिसून येते. युरोपातील निरनिराळ्या देशांच्या समाज-जीवनावरून व इतिहासावरून भारताला कोणता बोध घेता येतो याचेही प्रत्यंतर हा प्रवासवृत्तान्त वाचताना येते. पाश्चात्त्य समाजजीवनात जे दोष आहेत ते टाळून आणि जे भारताच्या विकासासाठी उपयुक्त आहे ते ग्रहण करून भारताने आपली सर्वांगीण उन्नती करून घ्यावी असे स्वामी विवेकानंदांना प्राणोप्राण वाटत असे. त्यांची ही तळमळ प्रस्तुत पुस्तकात अनेक ठिकाणी प्रकट झालेली आढळून येते आणि तिचा परिणाम वाचकांच्याही मनावर झाल्यावाचून राहत नाही.
General
- AuthorSwami Vivekananda
- TranslatorP. G. Sahastrabuddhe