




Product Details
Specifications
प्रस्तुत पुस्तक ‘वेदान्त हा भावी जगाचा धर्म आहे काय?’ या पुस्तकातील अध्यायांची पुनर्रचना करून नव्याने प्रकाशित करीत आहोत. प्रस्तुत पुस्तक म्हणजे स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेत विभिन्न स्थानी दिलेल्या काही व्याख्यानांचा संग्रह आहे. प्रत्येकाच्या मनात ईश्वराविषयी प्रेमादराची भावना असतेच. ते ईश्वराविषयीचे ‘दिव्य प्रेम’ कोणत्या प्रकारचे असते, ‘उपासना कशी करावी?’ वा ‘उपासनेचे खरे स्वरूप कोणते आहे?’ हा प्रश्न मात्र प्रत्येकाला नेहमीच भेडसावत असतो. त्याबरोबरच धर्म म्हणजे काय? धर्मसाधना कोणत्या प्रकारची असते? वेदान्ताने जगाला कोणती शिकवण दिली? वेदान्त हा भावी जगाचा धर्म होऊ शकतो काय? इत्यादी प्रश्न देखील आपल्या मनात सतत उद्भवत असतात. या विषयांवरील स्वामीजींचे उद्बोधक व स्फूर्तिदायी विचार प्रस्तुत पुस्तकात वाचावयास मिळतील. स्वामीजी आधुनिक काळातील सर्वोच्च आध्यात्मिक अनुभूतिसंपन्न महापुरुष होते. अलौकिक पारमार्थिक ज्ञानाचे उद्गाते आणि व्यावहारिक ज्ञानाचे मार्गदर्शक म्हणून ते ख्यातनाम आहेत. स्वामी विवेकानंदांनी जगातील विभिन्न धर्मांचा तुलनात्मक अभ्यास केला होता व निरनिराळ्या धर्मांतील तत्त्वांचे सखोल चिंतन व मनन करून ते विशिष्ट निष्कर्षाप्रत पोहोचले होते. या सार्या निष्कर्षांचे सार वाचकांना प्रस्तुत पुस्तकात आढळेल व स्वामीजींच्या अलौकिक प्रतिभेचे त्यांना दर्शन घडेल.
General
- AuthorSwami Vivekananda
- TranslatorS M Kulkarni