




M039 Vedantache Swarupa Ani Prabhav (वेदान्ताचे स्वरूप आणि प्रभाव)
Non-returnable
Rs.20.00
Tags:
Product Details
Specifications
साधारणतः लोकांची अशी समजूत असते की वेदान्त फार गूढ असून त्याचा दैनंदिन जीवनाशी काहीही संबंध नाही. प्रस्तुत पुस्तकात स्वामी विवेकानंदांनी दर्शवून दिले आहे की ही समजूत चुकीची आहे. वेदान्ताची शिकवण कोणत्या स्वरूपाची आहे व वेदान्तात कोणती जीवनदायी तत्त्वे अनुस्यूत आहेत याचे स्वामी विवेकानंदांनी प्रस्तुत पुस्तकात सुबोध भाषेत तर्कसंगत पद्धतीने विवरण केले आहे. वैयक्तिक आणि सामाजिक जीवनाच्या विकासासाठी वेदान्त हा खरोखरी उपयुक्त ठरू शकतो हे सत्य त्यांनी निःसंदिग्ध शब्दांत आपल्यासमोर मांडले आहे. त्याचप्रमाणे वेदान्तातील सिद्धान्त हे एकांगी नसून ते सार्वजनीन स्वरूपाचे आहेत व जगातील कोणत्याही देशात राहणाऱ्या व कोणत्याही धर्माचे अनुसरण करणाऱ्या लोकांना ते स्फूर्ती देऊ शकतात या सत्यावरही स्वामी विवेकानंदांनी प्रस्तुत पुस्तकात प्रकाश पाडला आहे.
प्रस्तुत पुस्तकापासून सर्वांनाच, विशेषतः सामाजिक व धार्मिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना, महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभेल असा आम्हाला विश्वास वाटतो
General
- AuthorSwami Vivekananda
- TranslatorDr. Narayanshastri Dravid