




Product Details
Specifications
स्वामी विवेकानंदांची उत्कट इच्छा होती की भारताने आपले पूर्वीचे गौरवाचे स्थान पुन: प्राप्त करून घ्यावे. हे उद्दिष्ट साधण्यासाठी ते नेहमी आपल्या व्याख्यानांतून कर्मयोगाचे महत्त्व प्रतिपादीत. प्रस्तुत पुस्तक कर्मयोगावरील त्यांच्या सुप्रसिद्ध व्याख्यानांचा संग्रह होय. मनुष्याला निष्क्रिय करणार्या तमोगुणाचा नाश करून त्याला ध्येयाभिमुख करावे व ‘आत्मनो मोक्षार्थं जगद्धिताय च’ हा आदर्श समोर ठेवून सर्वांनी आत्मज्ञान नि लोकहित ही दोन्ही साधावी असे स्वामीजींना अगदी हृदयापासून वाटत असे आणि हीच शिकवण त्यांनी आपल्या व्याख्यानांतून दिली आहे. त्यांचे स्वत:चे जीवन म्हणजे ह्या ध्येयप्राप्तीचे प्रत्यक्ष उदाहरण; म्हणूनच त्यांच्या शब्दांत अपार शक्ती साठलेली आहे.
General
- AuthorSwami Vivekananda
- TranslatorSwami Shivatattwananda