




Product Details
Specifications
स्वामी विवेकानंद, स्वत:चे गुरुदेव जे भगवान श्रीरामकृष्ण, त्यांविषयी वक्तृतामंचावरून जनतेसमोर फारच क्वचित बोलत, बोलतच नसत म्हटले तरी चालेल. आणि त्यांच्यासंबंधी एक संपूर्ण भाषण तर त्यांनी फक्त एकदाच दिले — तेच प्रस्तुत ‘माझे गुरुदेव’. या सारगर्भ ओजस्वी व्याख्यानात स्वामीजींनी श्रीरामकृष्णांच्या अभूतपूर्व लोकोत्तर साधनेचे रोमांचकारी वर्णन करून त्यांच्या उत्पत्ति-परिपूत दिव्य जीवनाचे हृदयंगम चित्र रेखाटले आहे. सांप्रत, देशी-विदेशी सर्वत्र धर्म-जगतात समन्वय संसाधित करण्याची प्रामाणिक दैवी स्पृहा आणि त्याचबरोबर सांप्रदायिक ईर्ष्येच्या धडधडत्या अग्निकुंडात परस्परांची बेदिक्कत आहुती देण्याची अमानुष प्रवृत्ती ही दृष्टोत्पत्तीस येतात. समन्वय काय वस्तू, त्याची साधना कोणती नि तो कसा प्रस्थापित होईल हे सर्वांगपूर्ण स्वरूपात श्रीरामकृष्ण देवांच्या अपूर्व जीवनात आविष्कृत झाले होते. समन्वय-मूर्ती भगवान श्रीरामकृष्णांचा हा भाव, त्यांचे प्रधान लीला-सहायक स्वामी विवेकानंद यांनी अत्यंत समर्पक नि उद्बोधक शब्दांत या व्याख्यानात विशद केला आहे. ह्या आणि आध्यात्मिक जीवनात अत्यावश्यक असलेल्या इतर सर्व बाबींचे सांगोपांग स्फूर्तिदायक विवरण स्वामीजींनी आपल्या गुरुदेवांच्या चरित्राद्वारा मोठ्या कुशलतेने केले आहे.
General
- AuthorSwami Vivekananda
- TranslatorSwami Shivatattwananda