Product Details
Specifications
स्वामी विवेकानंदांनी या व्याख्यानामधे महाभारताची कथा संक्षेपाने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. खरे तर महर्षी व्यासदेवांनी आपल्या या ग्रंथात जगात आढळणार्या चांगल्या व वाईट अनेक व्यक्तींची स्वभाव वैशिष्ट्ये आणि असंख्य महापुरुषांची उन्नत आणि उदात्त चरित्रे वर्णिली आहेत; परंतु त्यांचा अगदी त्रोटक परिचयही एखाद्या लहानशा व्याख्यानात करून देणे खरोखर अशक्यप्राय होय. तरीदेखील स्वामीजींच्या या व्याख्यानातून पांडवांचे उज्ज्वल चारित्र्य, शील व शौर्य तसेच ज्येष्ठ भ्राता राजा युधिष्ठिरांवरील त्यांची अगाध निष्ठा व आज्ञाधारकपणा इत्यादींचे सुंदर चित्रण आढळते. स्वामीजींच्या मनामध्ये आध्यात्मिक ज्ञानाचा मूर्तिमान आदर्श अशा पुरुषोत्तम श्रीकृष्णांच्या अजोड व्यक्तिमत्त्वाबद्दल असलेला आदरही दृग्गोचर होतो. स्वामी विवेकानंदांनी 1 फेब्रुवारी 1900 रोजी, अमेरिकेमध्ये कॅलिफोर्नियातील पॅसाडेना येथील ‘शेक्सपिअर क्लब’मध्ये ‘महाभारत’ या विषयावर एक व्याख्यान दिले होते.
General
- AuthorSwami Vivekananda